मी मुंबईकर... या ब्लॉग वर आपले स्वागत आहे......
मराठा मोडेल पण वाकणार नाही पेटतील मशाली वीझतील मशाली सुर्या कधीच विझनार नाही प्रयत्न करा किती ही पण हे कधीच घडणार नाही मराठा मोडेल पण वाकणार नाही मराठी मरेल पण शरण आलेल्याना मारणार नाही मराठा मायेने रडेल पण संकाटाना भिवून पळणार नाही आणि हो दुसर्याना बेघर करून घर स्वाताचे भरणार नाही मराठा महाराज्यान पुढे श्वासाची ही किमत धरणार नाही शिवांसाठी वेळ आली तर मरूनही मरणार नाही आसतील लाख मतभेद पण वेळ आल्यावर ते उरणार नाही संपातील सारे पण स्वराज, मराठा कधी ही संपणार नाही
Sunday, 26 February 2012
Thursday, 5 May 2011
उत्तुंग भरारी घेऊ या ....मी मराठी .
उत्तुंग भरारी घेऊ या !
उज्ज्वल भविष्यासाठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....
शिवबाची तलवार तळपली
महाराष्ट्र अस्मिता फडकली
संतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभवशाली
ऋषिमुनी अन् थोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले
आदर्शांचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेले
युक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....
गणाधीश नाचतो रंगुनी
नवरात्रीची अंबा भवानी
यळकोटाचा भंडार उधळी खंडोबाची आण घेउनी
वारकऱ्यांची सुरेल दिंडी
विठुरायाचे नाम गर्जते
समृद्धीची पावनगंगा भरून येथे नित्य वाहते
मनगटात यश अमुच्या आहे अमुच्या आणि किर्ती ललाटी
मी मराठी ..... मी मराठी .....
अभंग, ओवी, फटका, गवळण, धुंद पवाडा, धुंद लावणी
माय मराठी भाषा अमुची नक्षीदार भरजरी पैठणी
ज्ञान-कला-भक्ती-विद्येचे वैभव येथे सदा नांदते
जे जे अनुपम अभिनव आहे ते ते सारे येथे घडते
शिकवू आम्ही भारताला देऊन आव्हाने मोठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....
घोर संकटे झेलून घेतील अमुचे अजिंक्य बाहू
काळाशीही झुंज देउनी सदैव विजयी राहू
जरी रांगडा बाणा अमुचा जीवास जीवही देऊ
अंगावर कोणी आले शिंगावरती घेऊ
साधे भोळी दिसतो परी गुण अमुच्या ठायी कोटी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....
महाराष्ट्र भू तुला मानतो सकळ जनांची आई
तुझ्या कुशीतुन सकळांसाठी अंकुरते अंगाई
संघर्षाचे शौर्य दिले तू धैर्य दिले जगण्याचे
तुझ्याच ठायी कृतार्थ व्हावे अवघे जीवन अमुचे
तुझाच जयजयकार असावा सदैव अमुच्या ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी ....
राधा ही बावरी
रंगात रंग तो शामरंग पाहण्या नजर भिरभिरते,
ऎकून तान, विसरून भान ही वाट कुणाची बघते,
त्या सप्त्सुरांच्या लाटेवरूनी साद ऎकूनी होई,
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
हिरव्या हिरव्या झाडांची, पिवळी पाने झुलताना,
चिंब चिंब देहावरूनी, श्रावणधारा झरताना,
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई,
हा उनाड वारा गूज प्रितीचे कानी सांगून जाई,
त्या सप्त्सुरांच्या लाटेवरूनी साद ऎकूनी होई,
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
आज इथे या तरूतळी, सूर वेणूचे खुणावती,
तुज सामोरे जाताना उगा पाऊले घुटमळती,
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई,
हा चंद्र चांदणे ढगाआडूनी प्रेम तयांचे पाही,
त्या सप्त्सुरांच्या लाटेवरूनी साद ऎकूनी होई,
राधा ही बावरी हरीची राधा ही
गालावर खळी डोळ्यात धुंदी
गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर खुले लाली गुलाबाची
कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इशारयाची
जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे
I Love you… I Love you … I Love you
कोणता हा मौसम मस्त रंगाचा... हा
तुझ्या सवे माझ्या जीवनी आला
सुने सुने होते किती मन माझे
आज तेच वाटे धुंद मधुशाला
जगण्याची मज आता कळते मजा
नाही मी कोणाचा आहे तुझा
सांगतो मी खरे खरे तुझ्या साठी जीव झुरे मन माझे थरारे
कधी तुझ्या पुढे पुढे कधी तुझ्या मागे मागे करतो मी इशारे
जाऊ नको दूर तू
जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे
तुझ्या पापण्यांच्या सावली खाली
मला जिंदगी घेउनी आली
तुझ्या चाहुलीची धुंदी आनंदी
अंतरास माझ्या छेडुनी गेली
जगण्याची मज आता येई नशा
तू माझे जीवन तू माझी दिशा
आता तरी माझ्या वरी कर तुझी जादूगिरी हुर हुर का जिवाला
बोल आता काही तरी भेट आता कुठे तरी कसला हा अबोला
हे जाऊ नको दूर तू
जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला
चिंब भिजलेले , रूप सजलेले
ह्या रिमझिम झिरमिळ पाऊस धारा
तन मन फुलूवून जाती
ह्या रिमझिम झिरमिळ पाऊस धारा
तन मन फुलूवून जाती
सहवास तुझा मधुमास फुलांचा
रंग सुखाचा हाती
हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा
उजळून रंग आले , स्वच्छंद प्रीतीचे
चिंब भिजलेले , रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे
ओढ जागे राजसा रे, अंतरी सुख बोले
सप्तरंगी पाखरू हे, इंद्रधनू बनू आले
लाट हि , वादळी , मोहुनी गाते
हि मिठी लाडकी भोवरा होते
पडसाद भावनांचे , रे बंध ना कुणाचे
दाही दिशांत गाणे, बेधुंद प्रीतीचे
चिंब भिजलेले , रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे
घेऊन ओले पंख आले रूप हे सुखाचे
रोम रोमी जागले दीप बघ स्वप्नाचे
बरसतो मोगरा थेंब गंधाचे
भरजरी वेल हे ताल छंदांचे
घन व्याकूळ रिमझिमणारा
मन अंतर दरवळणारा
हि स्वर्ग सुखाची दारे
हे गीत प्रीतीचे
चिंब भिजलेले , रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे
माझी माय
हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय
आयाबाया सांगत व्हत्या व्हतो जवा तान्हा
दुस्काळात मायेच्या माजे आटला व्हता पान्हा
पिठामंदी पानी टाकून पाजत जाय
तवा मले पिठामंदी दिसती माझी माय
कन्या-काट्या येचायाला माय जाई रानी
पायात नसे वहान तिच्या फिरे अनवानी
काट्याकुट्यालाही तिचं नसे पाय
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय
बाप माझा रोज लावी मायच्या मागं टुमनं
बास झालं शिक्षान आता घेऊ दे हाती काम
शिकुनश्यानं कुठं मोठ्ठा मास्तर हुनार हायं
तवा मले मास्तरमंदी दिसतो माझी माय
दारु पिऊन मायेले मारी जवा माझा बाप
थरथर कापे आन लागे तिले धाप
कसायाच्या दावनीला बांधली जशी गाय
तवा मले गायीमंदी दिसती माझी माय
बोलता बोलता येकदा तिच्या डोळा आलं पानी
सांग म्हने राजा तुझी कवा दिसंल रानी
भरल्या डोल्यान कवा पाहील दुधावरची साय
तवा मले सायीमंदी दिसती माझी माय
म्हनून म्हंतो आनंदानं भरावी तुझी वटी
पुना येकदा जलम घ्यावा तुजे पोटी
तुझ्या चरनी ठेवून माया धरावं तुझं पाय
तवा मले पायामंदी दिसती माझी माय
पहाटे पहाटे मला जाग आली
पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली
मला आठवेना, तुला आठवेना
कशी रात गेली कुणाला कळेना
तरीही नभाला पुरेशी न लाली
गडे हे बहाणे, निमित्ते कशाला
असा राहू दे हात, माझा उशाला
मऊ मोकळे केस, हे सोड गाली
तुला आण त्या वेचल्या तारकांची
तुला आण त्या जागणार्या फुलांची
लपेटून घे तू मला भोवताली
अरे मनमोहना,
अरे मनमोहना,
कळली देवा तुला, राधिका रे राधिका
कळली राधिका रे कळल्या गोपिका
साधी भोळी मीरा तुला कळली नाही
तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही
सात सुरांवर तन-मन नाचे
तालावरती मधुबन नाचे
एक अबोली होती फुलली
तिच्याकडे नजर तुझी वळली नाही
धुंद सुगंधी यमुना लहरी
उजळून आली गोकुळ नगरी
जीवन माझे अंधाराचे
काळी काळी रात कधी टळली नाही
उन्हात काया, मनात छाया
कशी समजावू वेडी माया
युग युग सरले, डोळे भरले
आशेची कळी कधी फुलली नाही
लख लख चंदेरी तेजाची...मराठी चित्रसृष्टीचे अवलोकन गीत
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या
तो काळ विसाव्या शतका आरंभीचा
या जगी चित्रपट बनू लागले होते
वारसा आम्हा जरी होता अष्टकलांचा
हे तंत्र आमुच्या देशी आले नव्हते
पण करुनी ठाम निर्धार योगी वृत्तीने
फाळके ऋषिंनी खडतर व्रत आचरिले
अर्जुनास जैसे लक्ष एकची डोळा
जे अशक्य होते शक्य तयांनी केले
मग कथा घेऊनी हरिश्चंद्र राजाची
या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले
शनिवार तीन मे एकोणिसशे तेरा
भारतभूमीवर चलतचित्र अवतरले
नव तेजाने मने उजळली घडली ऐसी किमया
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या
प्रभात आली प्रभात झाली जगती गाजावाजा
बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा
चित्र म्हणा वा फिल्म, सिनेमा, पिक्चर, मुव्ही काही म्हणा
आनंदाचा झोत असे हा संस्कृतीच्या पाऊल खूणा
घटकाभरची करमणूक वा दोन घडीचा विरंगूळा
बघता बघता व्यापून जातो देहभान अमुचे सगळा
रडणाऱ्याचे अश्रू पुसतो लकेर देतो हास्याची
पराभूताला चाहूल देतो भविष्यातल्या भाग्याची
आयुष्याच्या क्षणाक्षणाशी बांधतसे रेशिम नाते
आठवणींना असा बिलगतो कंठाशी दाटून येते
जीवाशीवाशी नाळ जोडती लावूनी जाती माया
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या
आता न आम्हा कुणी थांबवा आम्ही घेतला श्वास नवा
पाठीवरती थाप हवी मज धीर हवा आधार हवा
सात समुद्रापार मराठी चित्रध्वजा आम्ही नेऊ
उच्च प्रतीच्या कलागुणांचे नजराणे आम्ही देऊ
रसीक जनांचे जीवन सारे आनंदाने पूर्ण भरू
भव्य दिव्य दृक्श्राव्य कलेचे सर्वाथाने चीज करू
नव्या चित्रसृष्टीचे ऐका पडघम अन् चौघडे
मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे
Subscribe to:
Posts (Atom)